छत्रपती संभाजीनगर – सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः तरुण रुग्णाचा ह्यामध्ये हृदयविकार प्रमाण आढळून येत आहे. आतापर्यंत हृदयाच्या धमन्यांची तपासणी करण्यासाठी अँजिओग्राफी ही ऍडमिट होऊन करायची तपासणी हाच एक पर्याय उपलब्ध होता परंतु आता मेडिकल हॉस्पिटल येथे ए आय बेस सिटी कोरोनारी अँजिओग्राफी ची सुविधा उपलब्ध झालेली असून, ही सुविधा ओ पी डी मध्ये उपलब्ध झाली आहे. वेदना रहित अत्यंत कमी धोका असलेली तपासणी म्हणून हिला जगमान्यता भेटलेली आहे.हृदयाची तपासणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची ऍडमिशनची आवश्यकता राहिलेली नाहीये. मराठवाड्यातील रुग्णांसाठी प्रथमच अल्प दरामध्ये आम्ही ह्या सुविधा उपलब्ध करून देत आहोत असे सेंटर हेड विशाल कुटे यांनी सांगितले. एन्जोप्लास्टी नंतरची फेर तपासणी असेल किंवा बायपास नंतरची फेर तपासणी असेल यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो असे तज्ञांनी मत व्यक्त केले. पत्रकार परिषदेमध्ये हृदयविकार तज्ञ डॉ. तुकाराम आवटे, डॉ. विक्रांत देशमुख, डॉ. कुलदीप तोटावर, डॉ. सुमित शेजुळ यांची उपस्थिती होती मेडिकल हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉक्टर विशाल कुटे यांनी सांगितले की नुकतेच मेडिकल हॉस्पिटलने पाच वर्षे पूर्ण केले असून आम्ही रुग्णांना अत्याधुनिक व अद्यावत सेवा सुविधा पुरवत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे मराठवाड्यातील जनतेने उच्च दर्जाच्या सुविधांचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो.










