छत्रपती संभाजीनगर, दि. 23 जानेवारी 2026
वीज ग्राहकांना अखंडित दर्जेदार तत्पर वीज सेवा देवून शुन्य वीज बिल मोहीम राबवा.तसेच मराठवाडयात छत्रपती संभाजीनगर, लातूर व नांदेड परिमंडलात कृषिपंप वीज ग्राहक वगळता घरगुती,व्यापारी व औघोगिक,पथदिवे, पाणी पुरवठा, शासकीय कार्यालय व इतर असे एकूण 14 लाख 96 हजार 633 वीज ग्राहकांकडे 3 हजार 797 कोटी 87 लाख 86 हजार रूपयांची थकबाकी आहे. ग्राहकांकडिल थकीत वीज बिलामुळे थकबाकीचा डोंगर वाढल्याने वीज बिल वसूलीशिवाय महावितरणला पर्याय नाही. थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित होवून अंधारात राहण्याची वेळ येवू नये. यासाठी सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी वीजबिले देय दिनांकाच्या अगोदर दरमहा विविध माध्यमांद्वारे थकबाकीसह चालू वीज बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने (भाप्रसे) यांनी केले आहे.
वीज बिलाच्या वसूलीवरच महावितरणचा आर्थिक डोलारा अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात विकलेल्या प्रत्येक युनिटचे बिलिंग होणे गरजेचे आहे. त्याचे 100 टक्के वीज बिल प्रत्येक महिन्याला वसूल करणे गरजे आहे. तरच महावितरणचा गाडा चालू शकेल. त्यासाठी अभियंता व कर्मचा—यांनी आपल्या कार्यक्षेत्रात वीज बिल वसूली मोहिमेत सहभागी होवून महसूल वसूल करावे. त्याच बरोबर सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळित दर्जेदार तत्पर वीज पुरवठा प्राधान्याने करावा.
ग्राहकांनी बिल तयार झाल्याच्या सात दिवसांत बिल भरल्यास जवळपास एक टक्के तत्पर देयक भरणा सूट मिळते. तसेच ऑनलाईन बिल भरल्यास 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट महावितरणतर्फे देण्यात येत आहे. गो ग्रीन छापील ऐवजी ई मेलवर बिल स्वीकारल्यास 10 रूपये सुट देण्यात येत आहे. वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या साईटवर जाउन या पर्यायावर आपला ग्राहक क्रमांक टाकून बिल भरता येईल. तसेच महावितरणचे वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे नेट बॅंकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट, united payment interface – UPI या माध्यमाद्वारे वीज बिल भरता येईल
मराठवाडयातील ग्राहकांकडिल थकबाकी कोटी रूपयांमध्ये पुढील प्रमाणे.
मंडल कार्यालय ग्राहक थकबाकी
छत्रपती संभाजीनगर शहर 1,21,900 100.25
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 2,04,700 350.61
जालना मंडल 138077 285.67
छत्रपती संभाजीनगर परिमंडल 464677 736.54
लातूर मंडल 206356 599.38
धाराशिव मंडल 152607 449.24
बीड मंडल 164555 533.33
लातूर परिमंडल 523518 1581.96
नांदेड मंडल 278730 582.46
परभणी मंडल 148261 738.72
हिंगोली मंडल 81447 158.16
नांदेड परिमंडल 508438 1479.36
मराठवाडा प्रादेशिक कार्यालय 14,96,633 3797.87
















