छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर मानसशास्त्र विभाग आणि इ कट्टा इनोव्हेटर्स एल एल पी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत ‘आंतरवैयक्तिक कौशल्य, नेतृत्व आणि व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटक सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ (Neuro psychiatrist)डॉ. संजीव सावजी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रंसगी ते बोलत होते वर्तमान काळात सभोवतालचे पर्यावरण हे अस्वस्थतेचे आहे. त्यातून विद्यार्थ्यांनी जीवन जगण्याची कला शिकली पाहिजे. जीवनात बौद्धिक गुणवत्ता जितकी महत्त्वाची आहे. त्याच समांतर पातळीवर भावनिक बुद्धिमत्ता ही महत्त्वाची आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासात भावनिक बुद्धिमत्तेला अग्रक्रमाने विकसित करणे महत्त्वाचे आहे. या घटकावरच व्यक्तीचे यश अवलंबून असते. सभोवतालच्या सुखदुःखाच्या परिस्थितीमध्ये जीवन जगताना आपण अंतर्गत प्रेरणा जागृत ठेवून यश संपादन करू शकतो. विद्यार्थ्यांनी आपले नेतृत्व कौशल्य विकसित करावे, हे कौशल्य विकसित करण्यासाठी स्वतःची अंतर्गत प्रेरणा अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या जीवनात समजदारपणा, वैयक्तिक भावभावना आणि त्या पातळीवरची निर्णय क्षमता ही अत्यंत महत्त्वाची आहे. व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. असे उद्घाटकाचे मनोगत व्यक्त करताना डॉ. संजीव सावजी म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रवि पाटील हे होते. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन हा व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे. चांगली समजणारी, चांगल्या समाजातून नेतृत्वगुणाचा विकास होऊ शकतो. असे ते म्हणाले.
या एकदिवसीय कार्यशाळेत पहिल्या सत्रात डॉ.संजीव सावजी यांनी ‘आंतर- वैयक्तिक कौशल्य, नेतृत्व व व्यवस्थापन कौशल्य’ या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात ऑनलाइन पद्धतीने मेंगलोर येथील सहाय्यक प्राध्यापक आणि समुपदेशक डॉ.अश्विनी शेट्टी यांनी ‘परिणामकारक व्यवस्थापन कौशल्य’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये संत तुकाराम महाविद्यालय कन्नड येथील डॉ.महेंद्र पाटील यांनी ‘आंतर वैयक्तिक कौशल्य’ या विषयावर आंतरक्रियात्मक व प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन केले. या एकदिवशीय कार्यशाळेच्या चौथ्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी ‘नेतृत्वगुणातील संवाद आणि निर्णय क्षमता’ या विषयावर मार्गदर्शन केले. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत आपण निश्चित ध्येय ठेवून निर्णय घेतला पाहिजे, या संदर्भात मार्गदर्शन त्यांनी केले.
फोटो चौकट
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालयचे मानसशास्त्र विभाग, देवगिरी महाविद्यालय आणि इ-कट्टा इनोव्हेटर्स एल.एल.पी.छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरवैयक्तिक कौशल्य, नेतृत्व आणि व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली, त्या प्रसंगी उद्घाटन करताना डॉ. संजीव सावजी छ.संभाजीनगर येथील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, इ-कट्टा इनोव्हेटर्स एल.एल.पी. चे संचालक, श्री. संकेत देशपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवि पाटील, उपप्राचार्या डॉ. अपर्णा तावरे, उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते, समन्वयक डॉ. मन्साराम औताडे .
याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अपर्णा तावरे, उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते, मानसशास्त्र विभागप्रमुख व कार्यशाळेचे समन्वयक डॉ. मन्साराम औताडे, ई-कट्टा इनोव्हेटर्स एल एल पी चे संचालक संकेत देशपांडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी मोताळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार अश्विनी पाटील यांनी मांडले . सदरील एक दिवशी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अतुल पवार, डॉ. त्रिवेणी पाटील, डॉ.कल्याणी वावरे, डॉ.अनुराधा भुसारी, प्रा. संजीवनी पांडुळे, प्रा.सोनू देहाडे, प्रा.पार्थ शिंदे, प्रा. जानवी तांबडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेत 150 प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे सहभाग नोंदविला. सदरील कार्यशाळेसाठी विविध विभागाचे विभागप्रमुख,प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















