आज २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने पिंपळे गुरव येथे ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेविका पल्लवीताई महेश जगताप यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक शामभाऊ जगताप तसेच नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कैलास गहिनीनाथ बनसोडे यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. तसेच संस्थेच्या सचिव सुरेखा कैलास बनसोडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.
या ध्वजवंदन कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी सोनाली पवार, बबिता राजपूत,वैशाली कांबळे, सुकुमार बनसोडे, आशा चव्हाण,धनश्री वनशिवे, मनीषा खंडाळे, मनीषा डिमिटरी, ज्योती विश्वासराव, रेखा क्षीरसागर, अमृता काटे, प्रकाश वनशिव,सचिन कुऱ्हाडे, पोपट केंजळे, नितीन भोसले, आनंदा चव्हाण यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभक्तीपूर्ण वातावरणात राष्ट्रध्वजाला मानवंदना देत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
















