सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.25, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी घाटनांद्रा व भराडी जि. प. सर्कल मधील विविध गावांत घेतलेल्या कॉर्नर सभांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावखेडा खुर्द, सावखेडा बुद्रुक , देउळगाव बाजार, कोटनांद्रा, आमठाणा, शिंदेंफळ, चिंचवन, धावडा, चारनेर, धारला, तळणी, कासोद, धामणी ,वांगी आणि मोढा या विविध गावांमध्ये झालेल्या या सभांना मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या कॉर्नर सभांमधून आमदार अब्दुल सत्तार यांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडत आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. विरोधक केवळ भूलथापांचे राजकारण करतात. आशा लोकांपासून सावध रहावे असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, श्रीराम महाजन, सुदर्शन अग्रवाल, राजेंद्र ठोंबरे, गजानन महाजन, डॉ. संजय जामकर, उमेदवार आशाताई गाढे, गणेश ढोरमारे, रघुनाथ मोरे, लवराज महाजन यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्ते , महिला व युवकांची लक्षणीय उपस्थिती होती.














