दि.२६ सोमवार रोजी प्रजासत्ताक दिनी शाळेत ध्वजवंदनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला, यावेळी आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी या माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आमदार दानवे यांनी विद्यार्थ्यांसोबत आस्थेवाईकपणे संवाद साधत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत साबळे, शाळेचे मुख्याध्यापक विकास वाघ, शिक्षक आत्माराम गाडेकर यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंदांची उपस्थिती होती.
भोकरदन शहरातील प्रतिष्ठित श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा शासकीय नोकरी मिळविल्या बद्दल भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पंचायतराज समितीचे अध्यक्ष संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. शाळेतील माजी विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांत शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक वाढविल्याचे गौरवोद्गार संतोष दानवे यांनी बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांत कार्यरत असलेले अतुल साळवे, शुभम मैंद, सौरभ दांडगे, करण कोल्हे या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला














