छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, एकनाथ बंगाळे, प्रविण फुलारी, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.
















