छत्रपती संभाजीनगर, दि.26(जिमाका) – देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन समारंभाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या शानदार संचालनाने उपस्थितांच्या मनात देशभक्तीची भावना वृद्धिंगत केली.
पोलीस आयुक्तालयातील देवगिरी मैदानावर हा मुख्य शासकीय सोहळा पार पडला. विधानपरिषदेचे सद्सय आ. संजय केणेकर, माजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, छत्रपत्री संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे तसेच सर्व विभागप्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. राज्यगीतही सादर झाले. पालकमंत्र्यांनी परेड निरीक्षण करुन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या भाषणात पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपल्या देशात प्रजासत्ताक लोकशाहीचा अंगिकार आजच्या दिवशी झाला. विविधतेने नटलेला आपला हा देश एकतेच्या सुत्रात गुंफणाऱ्या संविधानाची महती घरोघरी पोहोचवू या. आपली लोकशाही, आपले प्रजासत्ताक बळकट करण्यासाठी सारे मिळून प्रयत्न करु. असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
विविध सन्मान
प्रजासत्ताक दिन समारंभात राष्ट्रपती पदक विजेते व पोलीस महासंचालक पदक विजेत्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती पदक विजेते
अपर पोलीस अधीक्षक किरण जितेंद्रसिंग पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक अफजलखान शहजादेखान पठाण
केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक 2025
पोलीस उपआयुक्त श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर,
पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह 2025
पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखा, पोलीस उपनिरीक्षक शेख हबीब खान, पोलीस उपनिरीक्षक दिपक सुगनसिंग परदेशी, विशेष शाखा, पोलीस उपनिरीक्षक इसाक उस्मानखान पठाण, पोलीस उपनिरीक्षक संजय जानुजी जोगदंडे, स.पोलीस उपनिरीक्षक विष्णु लक्ष्मणराव उगले, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रभाकर साहेबराव राऊत, संतोष गंगाराम लोढे, विठ्ठल विनायकराव मानकापे, कैलास तेजराव गाडेकर, मच्छींद्रनाथ रंगनाथ जाधव, शिवाजी राजाराम कचरे, श्रीमती दरखशा इल्तेजा रिजवान शेख, मो.इरफान मो.इसाक खान ,राजेंद्र देविदास चौधरी, लक्ष्मण दशरथ किर्तीकर, बाळासाहेब जयसिंग आंधळे, मुस्ताफ गफुर शेख, सुनिल सुरेश बेलकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप अंबादास फाटे.
















