ज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय येथे आज 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री प्रकाश बाबुरावजी काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून अजिंठा शिक्षण संस्थेचे संचालक माननीय शिवदीप रंगनाथ काळे हे उपस्थित होते. याप्रसंगी प्र .प्राचार्य डॉ. पंडित शेषराव नलावडे, उत्तमरावजी पाटील नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अन्वरसाब नरेगल, उप प्राचार्य रविकुमार गोटेड, डॉ .प्रशांत हिरेमठ,श्री.जय सोने, डॉ. एम. आर. खान, डॉ. दिलीप बिरूटे, डॉ. दिगंबर गंगावणे, डॉ. शिल्पा जिवरग, डॉ.भास्कर टेकाळे डॉ. लक्ष्मीनारायण कुरपटवार प्रा.गोविंद फड,डॉ.श्रीकांत जाधव,डॉ.राजू तुपे ,प्रा.रामहरी सोंडगे प्रा.प्रफुल्ल देवरे , डॉ . तुषार कांबळे ,राजु मोरे,मुदशीर बेग, राहुल रणदिवे , अजय राठोड, गौरी राजपूत, श्याम पवार, सुगंधा आडे, बुधभूषण रणदिवे व विद्यार्थी,पालक उपस्थित होते. या प्रसंगी भारत सरकारच्या *एक पेड माँ के नाम या* उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी डॉ.प्रशांत देशमुख यांच्या सोबत सर्वांनी भारताच्या संविधान उद्देशिकेचे वाचन केले. त्यानंतर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला. श्री प्रकाश काळे यांनी 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देताना भारतामध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष ,आणि लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
















