ठाणे :—- २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक ७७ व्या दिनानिमित्त ध्वजारोहण मलबार हिल डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन शाळेच्या वतीने सिमलानगर मलबारहिल नेपियनसी रोड ,मुंबई येथे विद्यार्थ्याचे सांस्कृतिक अतिशय सुंदर लोभस अनोख्या स्फूर्तिदायक पध्दतीने मोठ्या उत्साहात सालाबाद प्रमाणे याही वर्षी संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ खंडू जगताप यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून संपन्न झाला. या वेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शनपर भाषणात समाजभूषण सो.ना.कांबळे गुरुजी म्हणाले की,संविधान मुल्यामुळे आपणास मुल्य प्रात झाल्याने आपण हिम्मतवान होवून किंमतमान झालो,आणि सर्व सामान्याना समता,स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय मिळून बहूजन समाज वंचिताचा विकास झाला आणि होतोय! हे सगळे श्रेय भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेच जाते.भारतीय संविधानाचा गौरव देशात परदेशात होवून डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे अजरामर झालेत म्हणूनच आज सारा देश स्वाभिमानाने बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मानवंदना देतोय,असे गौरवोद्गार समाजभूषण सो.ना.कांबळे यांनी आपल्या भाषणात काढून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.सदर प्रसंगी शाळेतील शिक्षक वर्ग विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवून आगळी वेगळी रंगत आणली असता, सदर कार्यक्रमास उपस्थितांनी चांगल्या प्रकारे दाद देऊन सर्व लहान मुलांचे कौतुक केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम मुख्याध्यापक बापुराव गायकवाड गुरुजी यांच्या मार्गदर्शनातून सर्वश्री विठ्ठल सोनकांबळे,एस टी घुमरे,दिपक लामतुरे, संदिप माने,राहूल माने,सुधाकर घुमरे, सुनिता भिमराव सूर्यवंशी,श्रीम चांगुनाबाई रघुनाथ लामतुरे,श्रीम सोजरबाई आनंद कांबळे,विमल अशोक ससाणे,आदिने परिश्रम घेतल्याची माहिती मुक्त पत्रकार समाजभूषण सो.ना.कांबळे गुरुजी यांनी दिली.
















