छत्रपती संभाजीनगर – आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने २४ जानेवारी रोजी गांधी भवन, विभागीय ग्रंथालयाजवळ, सिल्लेखाना रोड, समर्थनगर येथे एकदिवसीय केडर कॅम्प व खरा आंबेडकरवादी कोण? याविषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, सदरील कार्यक्रमाचे उद्घाघाटन श्रीमती छाया मेश्राम यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला त्यानंतर त्यांनी ऊदघाटकिय भाषण केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना समितिचे अध्यक्ष श्रावणदादा गायकवाड म्हणाले की,जातिचा नव्हे तर बाबासाहेबांची विचारधारा आत्मसात करून जातविरहित समतामुलक समाज निर्माण करण्यासाठी व बाबासाहेबांच्या विचारधारेला प्रमाण मानून समाजामध्ये जनजागृती करणारा तोच खरा आंबेडकरवादी होय,नो लेफ्ट नो राईट ओन्ली आंबेडकरांईट ही भुमिका घेऊन मागिल पाच वर्षांपासून समिती केडर कॅम्प, वर्कशॉप, परिसंवाद, चर्चासत्र आदि बौद्धिक कार्यक्रम घेऊन आंबेडकरवादी विचारधारा समाजामध्ये रुजविण्यासाठी सातत्याने काम करत असल्याचे गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणांत स्पष्ट केले.तसेच कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित केडर कॅम्पमध्ये प्रशिक्षक म्हणून इंजिनिअर भिमसेन कांबळे यांनी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता कसा असावा याबाबत सविस्तर माहिती दिली, रामराव दाभाडे यांनी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप केला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब शिंदे, एम.एस.डांबरे, अनंत भवरे, ज्ञानेश्वर खंदारे, रवींद्र गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मंचावर मधुकर ठोंबरे, आशिष गायकवाड,किशोर गडकर, संतोष मोकळे, अरूण खरात, संजय जाटवे, विजय मोरे, किशोर निकाळजे, कचरु गवळी आदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास रोडे यांनी केले तर सुत्रसंचलन सोमनाथ वाघमारे यांनी केले शेवटी रवि बोर्डे यांनी आभारप्रदर्शन करून समारोप केला, सुरवातीला शाहिर उत्तम म्हस्के यांनी क्रांतिकारी भिमगिते गाऊन नवचैतन्य निर्माण केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार स्वागताध्यक्ष अक्षय जिनवाल व आकाश ढिलपे यांनी केला आहे.
यावेळी उत्तम जाधव, गंगाधर म्हस्के, कॅप्टन रमेश खरात, रामभाऊ पेटकर, प्रा. किर्तीलता पेटकर, अनिता गायकवाड, सुनील शिंदे,पवन पाखरे, कैलास गायकवाड, मिलिंद दाभाडे,अँड अतुल कांबळे,सुरज पाखरे, मेजर शिवाजी घोबळे, दिलिप गंगावणे, रोहिदास गोरमे,राजु काकडे,अमर गोरमे, सचिन बागुल,अमरदिप हिवराळे, राहुल बोटुळे, सतिश राठोड, राजु गवळी, शांतावन पारखे, पवन मगरे, संतोष ससाणे, बाबासाहेब शिंदे, राजकुमार सुर्यवंशी,बि.के.जाधवमामा , भिमराव बर्डे, वसंत माटे, रावसाहेब माटे, भानुदास माटे, बबन मगरे, शांतावन पारखे, भास्कर ससाने,अजय पाखरे, अशोक खरात, दिलीप बनकर, अंकुश दाभाडे, दिनकर मगर, वसंत धवसे आदि उपस्थित होते.














