सिल्लोड (प्रतिनिधी) जिल्हा परिषद समिती मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न झाली.गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दिला आहे.मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था,यशवंत कॉलेजच्या पाठीमागे जळगाव रोड,सिल्लोड तालुका सिल्लोड येथे सर्व मतदान अधिकारी यांचे निवडणूक प्रशिक्षण झाले.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.निलेश अपार यांनी सर्वांना प्रशिक्षण देऊन सर्वांना प्रोजेक्टवर माहिती दिली.कर्मचाऱ्यांच्या समस्याचे निराकरण केले.एकूण केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी 1826 पैकी 1497 उपस्थित होते.329 अनुपस्थित होते. अनुपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट नमूद केले .
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.संजय देवराये (तहसीलदार,सिल्लोड),श्री.रत्नाकर पगार (गटविकासाधिकारी,प.स.सिल्लोड) श्री.कारभारी दिवेकर (मुख्याधिकारी, न.प.सिल्लोड), श्री.रमेश ठाकूर (गटशिक्षणाधिकारी,प.स.सिल्लोड), मिडिया कक्ष प्रमुख जुबेर सिद्दीकी (प्रशासकिय अधिकारी न.प.सिल्लोड) श्री.देवेंद्र सूर्यवंशी (प्रकल्प अधिकारी न.प.सिल्लोड),श्री.जितेंद्र पानपाटील हे सर्व प्रशिक्षणास उपस्थितीत होते.














