छत्रपती संभाजीनगर, दि.२४: खुलताबाद तालुक्यातील देवळाणा खुर्द येथील रहिवासी हितेंद्र विष्णुपंत देवळाणकर यांचे शनिवारी (दि.२४) सकाळी अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, मुलगा, पत्नी, एक बहीण, नितीन, अजित, उदय, राघवेंद्र व शैलेंद्र हे पाच भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार येत्या (दि. २७ जानेवारी रोजी पुणे येथे करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर त्यांची ते ज्येष्ठ बंधू होत.














