सिल्लोड (प्रतिनिधी-)77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोढा( बु) येथे भारतीय स्वातंत्र्याचा देखावा शाळेतील शिक्षक मिलिंद धाकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केला. विद्यार्थ्यांनी यामध्ये विविध कलाकृती सादर करीत गावकऱ्यांची मने जिंकली.या मध्ये पहिले नृत्य रूपाली गायकवाड, कीर्ती महाकाळ, आरती सोनवणे ,श्रुती हावळे ,कल्याणी ढोरमारे ,तनुजा पारवे यांनी सादर केले
त्यानंतर नाटकामध्ये राणी लक्ष्मीबाई चे भूमिकेत नंदिनी ढोरमारे, बिरसा मुंडा- गणेश भिवसने, चंद्रशेखर आझाद -मयूर शिरसाठ ,भगतसिंग- साई पवार, सुखदेव- संविधान साबळे, राजगुरू- कार्तिक ढोरमारे ,जल्लाद- भूषण हावळे ,इंग्रज अधिकारी -भारत हावळे ,सोहम काकडे .पोलीस -गौरव ढोरमारे, महात्मा गांधी- कार्तिक महाकाळ ,क्रांतिकारक- स्वराज काकडे, विनोद काकडे डॉक्टर बाबासाहेबांचे भूमिकेत आरुष सुरडकर, पंडित नेहरू- अभिषेक ढोरमारे .भारत माता -ऋतुजा सुरडकर. दुसरे नृत्य -तनुजा ढोरमारे, आराध्या ढोरमारे प्रांजल ढोरमारे, नम्रता महाकाळ ,प्रीती सोनवणे ,खुशी ढोरमारे, यांनी सादर केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -राम हावळे ,कुणाल काकडे ,विराट सुरडकर यांनी केले.
या कार्यक्रमाला मोढा बु गावचे सरपंच, उपसरपंच ,ग्राम सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य ,पालक ,ग्रामस्थ मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते














