छत्रपती संभाजीनगर, दि.२७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर सकाळी आठ वाजता ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सर्व अधिष्ठाता, अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक व विद्यार्थी यांची यावेळी उपस्थिती होती. सुरक्षा अधिकारी बाळू इंगळे यांनी सोहळ्याची संचलन केले.














