पैठण प्रतिनिधी :- नाथषष्टी यात्रेच्या संदर्भात पैठण नगर परिषद सभागृहात आयोजित न.प सदस्यांची पहिली बैठक खासदार संदीपान भुमरे पैठण तालुक्याचे आमदार विलास बाप्पू भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्षा विद्याताई कावसनकर,उप नगराध्यक्ष तुषार पाटील, मुख्याधिकारी डॉ पल्लवी अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.या बैठकीत यात्रेत येणाऱ्या व्यापारी भाविकांकडून घेण्यात येणारे दुकानीचे कर प्रती ५ हजारांवरून फक्त १ हजारांवर करण्यात येणाऱ्या नगराध्यक्षा विद्याताई कावसनकर यांच्या प्रस्तावाला समस्त सदस्यांनी अनुमोदन दिले.
शांतीब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज समाधी पर्व नाथषष्टी यात्रेत सहभागी होण्यासाठी देशासह राज्याच्या कान्याकोपऱ्यातून भाविक भक्त हजेरी लावतात. यासाठी अनेक भाविक व्यापारी आपल्या छोट्या मोठ्या दुकाना यात्रेत लावतात. दहा वर्षांपूर्वी पासून यात्रेतील व्यापारी कडुन पाचशे रुपये प्रती फूट प्रमाणे म्हणजेज १० फूट जागेवर दुकान लावल्यास ५ हजार रुपये जागेचे कर घेण्यात येत होते. यामुळे गरीब व्यापाऱ्यांनी नाथषष्टी यात्रेत मोठा त्रास सहन करावा लागत होता. यासाठी नगराध्यक्षा विद्याताई कावसनकर यांनी पहिल्याच मिटिंग मध्ये प्रस्ताव मांडून सदरील रजाकारी कर कमी करण्याचे काम केले. त्याच प्रमाणे.नगराध्यक्षा कावसनकर यांनी मांडलेला दुसरा प्रस्तावा नुसार दिव्यांगांना पाहिले वार्षिक प्रत्येकी १ हजार पाचशे मिळत असे. ते आता प्रत्येकी दोन करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा विद्याताई कावासनकर यांनी दिली.
बैठकीला नगरसेवक रफिक कादरी,ईश्वर दगडे,सुनील रासने,बजरंग लिंबोरे,विलास आडसुल,गौरव आठवले,महेश मुंदडा,गोवर्धन टाक,वीर करकोटक हस्नोद्दीन कट्यारे,ज्ञानेश्वर दहिवाळ,नगरसेविका कविता शिंदे,राजश्री गायकवाड, संगीता मापारी,वैशाली परदेशी,अलका परदेशी,मंगल हिंगे,रुपाली सोनारे,अनिता वीर,मनिषा साळवे,पूजा पारीख,योगिता वरकड स्नेहल धुपे, असिफा पठाण आदी सदस्य उपस्थित होते.














