सोयगाव,ता.२७(प्रतिनिधी) सोयगाव तालुक्यात तीन गट आणि सहा गणांसाठी मंगळवारी (दि.२७) उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवशी जिल्हा परिषदेच्या तीन गटात ११ तर सहा गणात १२ असे एकूण २१ उमेदवारांनी निवडणुकी मधून माघार घेतली असून तीन गटांसाठी११ तर सहा गणांसाठी २६ उमेदवार रिंगणात असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रूपेश सिनगारे यांनी सांगितले
सोयगाव तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश सिनगारे,सहायक मनिषा मेने यांनी माघारीची प्रक्रिया राबविली मंगळवारी( दि.२७) उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवशी २१ जणांनी माघार घेतली आहे. दरम्यान एकूण ५९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते त्यापैकी गटात २२ तर गणात ३८ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते, परंतु माघारीच्या अंतिम दिवशी २१ उमेदवारांनी माघार घेतली आहे यामध्ये फरदापुर गणातून दोन, सावळदबारा गणातून तीन,आमखेडा गणातून एक,निंबायती गणातून तीन,बनोटी गणातून तीन,गोंदेगाव गणातून एकही उमेदवारी अर्ज माघार झाला नाही त्यामुळे या गणात उद्धव सेना,भाजप, शिंदेंसेना, राष्ट्रवादी शरद पवार,राष्ट्रवादी अजित पवार अशी बहुरंगी लढत रंगली आहे फरदापुर गणात शिंदेंसेना व भाजप यांच्यात सरळ लढत होत आहे. सावळदबारा गणात एका अपक्ष सह भाजप, शिंदेंसेना, राष्ट्रवादी शरद पवार,बसपा, उद्धव सेना अशी लढत होत आहे आमखेडा गणात भाजप, शिंदेंसेना, वंचित बहुजन अशी तिरंगी लढत होत असून निंबायती गणात शिंदे सेना,भाजप, राष्ट्रवादी अजित पवार,बसपा, आणि उद्धव सेना अशी बहुरंगी लढत आहे तर फरदापुर गटातून चार जणांनी माघार घेतली आहे.या गटात भाजप, शिंदेंसेना आणि वंचित बहुजन अशी तिरंगी लढत होत आहे आमखेडा गटातून एकही माघार झाली नाही या गटात शिंदेंसेना, भाजप आणि बसप यांच्यात तिरंगी लढत होत आहे गोंदेगाव गटातून दोघांनी माघार घेतली आहे,परंतु या गटात भाजप, शिंदेंसेना,उद्धव सेना, राष्ट्रवादी अजित पवार,राष्ट्रवादी शरद पवार,अशी लढत होत आहे















