पैठण प्रतिनिधी :- पैठण तालुका जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून आता निवडणूकीच्या रिंगणात जिल्हा परिषदेच्या ९ जागेसाठी ३५ तर पंचायत समितीच्या १८ जागेसाठी ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. संतपीठ येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थित उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले.
पैठणच्या चितेगांव गट उमेदवार कृष्णा गिधाने धनुष्यबाण, रामदास गिधाने घड्याळ, दीपक फंदाडे मशाल, तय्यब पठाण पतंग, रंगनाथ लाघाने कपबासी गटात एकूण ५ उमेदवार, बीडकीन गट उमेदवार विजय चव्हाण कमळ, काकासाहेब टेके धनुष्यबाण, मनोज पेरे मशाल, विष्णू घुगे कपबशी गटात एकूण ४ उमेदवार, आडुळ गट उमेदवार रुपाली तवार धनुष्यबाण, पल्लवी पिवळं मशाल, उषा राठोड घड्याळ गटात एकूण ३ उमेदवार, पाचोड गटात शिवराज भुमरे धनुष्यबाण, विलास शेळके घड्याळ, गोरख चव्हाण कपबशी गटात एकूण ३ उमेदवार, दावरवाडी गटात उमेदवार जयश्री वाघामोडे धनुष्यबाण, अर्चना सरोदे मशाल, कांताबाई सोनवणे निशाणी शिट्टी, प्रियंका तांगडे कपबशी गटात एकूण ४ उमेदवार, ढोरकिन गट उमेदवार सविता जगताप धनुष्यबाण, सुनीता वाघचौरे घड्याळ गटात एकूण २ उमेदवार, पिंपळवाडी गटात उमेदवार सदानंद खडसन पंजा, राहुल चाबूकस्वार मशाल, कारभारी लोहकरे धनुष्यबाण, कल्याण चाबूकस्वार कपबशी गटात एकूण ४ उमेदवार, विहामंडवा गटात उमेदवार नितीन तांबे धनुष्यबाण, विनोद तांबे घड्याळ, बाबासाहेब पवार पंजा, भाऊसाहेब काळे कपबशी, संजना जाधव निशाणी कपाट, हरी नवथर निशाणी लिफाफा गटात एकूण ६ उमेदवार आणि नवगांव गटात उमेदवार पांडुरंग औटे धनुष्यबाण, ज्ञानेश्वर कापसे घड्याळ, रफिक पटेल पंजा, परसराम खोपडे कपबशी गटात एकूण ४ उमेदवार आपले नशीब आजमवणार आहेत. तर चितेगांव गण उमेदवार कमल त्रिभुवन घड्याळ, सोनाबाई नरवडे तुतारी वाजवणारा माणूस, प्रियंका भुजंग धनुष्यबाण गणात एकूण ३ उमेदवार, रांजनगांव खुरी गणात उमेदवार गणेश नागे मशाल, मधुकर मरकट घड्याळ, संजय लघाने धनुष्यबाण गणात एकूण ३ उमेदवार, बीडकीन गण उमेदवार अक्षय गवारे धनुष्यबाण, उमेश गुजर कमळ, फिरोज सय्यद मशाल, गफार शेख पतंग अभिजित ढाकेफळे रोड रोलर गणात एकूण ५ उमेदवार, निलजगांव गण उमेदवार सविता आडे धनुष्यबाण, गीता कोलूडेकर मशाल, आरती राठोड कमळ, अनिता पवार बॅट गणात एकूण ४ उमेदवार, आडुळ गणात उमेदवार कशाबाई कोल्हे धनुष्यबाण, सरला पिवळं घड्याळ, उषा राख मशाल गणात एकूण ३ उमेदवार, बालानगर गणात उमेदवार चित्रा गोर्डे मशाल, नर्मदा नलावडे धनुष्यबाण, रुबाबबी शेख घड्याळ, सगुणाबाई चव्हाण कपबशी गणात एकूण ४ उमेदवार, पाचोड गण उमेदवार अलका गोजरे धनुष्यबाण, सुनीता भुमरे घड्याळ, पारबती ठोके निशाणी बस गणात एकूण ३ उमेदवार, एकतुनी गणात उमेदवार छाया कोठुळे घड्याळ, सोपान थोरे धनुष्यबाण, विष्णू कमळकर कपाट सुदर्शन गिते छताचा पंखा फारूक शेख शिलाई मशीन गणात एकूण ५ उमेदवार, दावरवाडी गणात उमेदवार राहिबाई वाघ धनुष्यबाण, सुषमा वाघ मशाल, सुशील वाघ निशाणी छत्री, शोभा सोरामरे निशाणी कपाट गणात एकूण ४ उमेदवार, नांदर गण उमेदवार उदयसेन काळे धनुष्यबाण, डॉ सुनील शिंदे मशाल, आकाश काळे नारळ, सतिष म्हस्के छत्री, सदाशिव मोटकर कपाट गणात एकूण ५ उमेदवार, ढोरकिन गणात उमेदवार वैशाली बोंबले धनुष्यबाण, नजराणा शेख घड्याळ, शिला एरंडे निशाणी कपबशी गणात एकूण ३ उमेदवार, लोहगांव गणात उमेदवार सुनीता इथापे निशाणी घड्याळ, अलका शेळके धनुष्यबाण गणात एकूण २ उमेदवार, पिंपळवाडी पिराची गणात उमेदवार दादासाहेब गलांडे धनुष्यबाण, शिवाजी सोनवणे पंजा, अप्पासाहेब सोलाट मशाल गणात एकूण ३ उमेदवार, मुधळवाडी गणात उमेदवार माणिक मिशाळ मशाल, भारत मुकुटमल धनुष्यबाण, राजेंद्र वाघमोडे तुतारी वाजवणारा माणूस, शेषेराव निकाळजे गॅस सिलेंडर, रामानाथ केदारे कपाट गणात एकूण ५ उमेदवार, विहामांडवा गणात उमेदवार बाबासाहेब नाचन घड्याळ, प्रमोद पान्हाळकर धनुष्यबाण, किशोर धायकरनिशाणी गॅस सिलेंडर, प्रल्हाद एखंडे पुस्तकं, अमोल भिंगारे शिलाई मशीन, इनुस शेख निशाणी छत्री गणात एकूण ६ उमेदवार, केकद जळगाव गणात उमेदवार प्रदीप नरके धनुष्यबाण, मुख्तर सय्यद पंजा, अंजली होरशील निशाणी घड्याळ भीमराव थोटे निशाणी शिट्टी, महेश पिसे निशाणी शिलाई मशीन, गणात एकूण ५ उमेदवार, नवगांव गणात उमेदवार संभाजी काटे पंजा, दत्तात्रय गायके धनुष्यबाण, तात्यासाहेब भावले घड्याळ, निवेश भावले निशाणी शिलाई मशीन, गणात एकूण ४ उमेदवार, आणि चांगतपुरी गणातील उमेदवार सकूबाई झारगड निशाणी धनुष्यबाण, पल्लवी दसपुते निशाणी पंजा, नंदा साबळे निशाणी घड्याळ गणात एकूण ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणूकिसाठी ५ फेब्रुवारी गुरुवार रोजी मतदान तसेच ७ फेब्रुवारी शनिवार रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ९ तसेच पंचायत समितीच्या १८ जागा ताब्यात घेण्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, भाजपा, भाजपा पुरुस्कृत पॅनल, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, एम.आय,एम, वंचित आदी पक्ष सरसावले आहेत.















