पिंपरी ता.२८ :- ७० कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आलेला धर्मविर छत्रपती संभाजी राजांचा पुतळा मात्र अजुनही अंधारातच आहे.
छत्रपती संभाजी राजांना हिंदुभुषण अर्थात ‘स्टॅच्यु ऑफ हिंदुभुषण’ म्हणून थाटामाटात ३५०० ढोल ताशांच्या पथकात राजांचा दुग्धाभिषेक करण्यात आला.
पिंपरी चिंचवडमध्ये बोराडेवाडी मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने बोराडेवाडी मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच पुतळा व स्मारक म्हणुन त्यांचा उल्लेख व्हावा या हेतुनेच हा १०० फुटी भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.या तर या पुतळ्यासाठी लागणारा चबुतरा हा ४० फूट उंचीचा बनवण्यात आला आहे.
भोसरी विधानसभा क्षेत्राचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने छत्रपती संभाजी महाराजांचे हे स्मारक जगातील सर्वात उंच ७० कोटी रूपये खर्च करून महानगर पालिकेच्यावतीने उभारण्यात आलेला हा पुतळा तथा स्मारक असून हेच स्मारक तथा छत्रपती संभाजी राजांचा पुतळा मात्र अजुनही अंधारातच आहे.अंधारात असलेल्या राजांची ही विटंबना तथा अवमान नव्हे काय ?
असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.तसेच कित्येक महीण्यापासून हा पुतळा अंधारात असून त्यांच्या अवतीभोवती लाईटची व्यवस्था करून त्याठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणुक कराया हवी होती.परंतू येथे ना लाईट आहे ना सुरक्षा रक्षक.उलट या पुतळ्याचे अजुन कित्येक महणे उलटून गेले तरी उदघाटनही झालेले दिसत नाही.एवढा मोठा कोट्यावधीचा खर्च करून उभारलेला हा पुतळा उदघाटनाविना अंधारात का आहे याचे कोडे मात्र सामान्य जनतेला उलगडलेले नाही.परंतू एक गोष्ट मात्र नक्की की,आजही सुरक्षेविना अंधारातच उदघाटनाची वाट पहात हा पुतळा दिमाखात उभा आहे.
















