ठाणे :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत क्षेत्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या समतादूत प्रकल्प अधिकारी ठाणे व मुंबई शहर जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी मेघा पवार यांची कोकण विभागातील उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून बार्टी तर्फे निवड करण्यात आली आहे.
उत्कृष्ट काम, उत्तम नियोजन व मनमिळाऊ स्वभाव यामुळे काम कसे आणि कश्या प्रकारे करुन घ्यावे ,हे यांचेकडून शिकायला मिळते.
आपले कौशल्य प्रभावीपणे वापरत सोशल मीडियाच्या माध्यमातून बार्टीच्या योजनांचा प्रसार, प्रचार ज्यांनी केला,अश्या मेघा पवार यांच्या गुणवत्तापूर्ण कार्याची दखल घेऊन बार्टीच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ही दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा रायगड जिल्ह्यातील क्रांतिभूमी,महाड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव मा. हर्षदीप कांबळे यांनी केले.कार्यशाळेला विशेष उपस्थिती म्हणून बार्टीचे महासंचालक मा. सुनील वारे, निबंधक मा. विशाल वारे तसेच कार्यशाळेचे मुख्य संयोजक व विभागप्रमुख मा. डॉ. बबन जोगदंड तसेच प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांच्यासह बार्टी चे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्प अधिकारी व समतादूत उपस्थित होते.
या राज्यस्तरीय कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते मेघा पवार यांना प्रशस्तीपत्र, गौरवचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
















