पुणे, दिनांक २८ जानेवारी २०२६
राज्याचे कुशल प्रशासकीय नेतृत्व आणि खंदे नेतृत्व अजित पवार यांचा आज, बुधवारी (ता.२८) विमान अपघातात दुदैवी मृत्यू झाला.पवारांसारखा मोठ्या नेत्याची ‘अकाली एक्झिट’ सर्वसामान्यांच्या मनाला चटका लावून जाणारी आहे.विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी यानिमित्ताने भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केली आहे.यासंदर्भात पाटील यांनी पुण्याचे पोलीस आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावत चौकशीची मागणी केली आहे.
भारत अगेन्स्ट करप्शनला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात सहकार्य करीत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल अजित दादांनी घेतली होती. दादांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कर्तृत्व, नेतृत्व सर्वमान्य होते.राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला शरद पवारांनंतर वाढवण्याचे काम अजित दादांनी केले आहे. अशात अचानक विमान अपघातात दुदैवी मृत्यूमुळे घातपाताची शक्यता नाकारता येवू शकत नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त करीत चौकशीची मागणी केली आहे. दादांच्या कुशल प्रशासकीय नेतृत्वाचा महाराष्ट्राला सदैव अभिमान राहील.
अजित दादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत अभ्यासू आणि स्पष्टवक्ते व्यक्तिमत्त्व होते. अनेकदा उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना त्यांनी राज्याच्या विकासाला जी गती दिली, ती कौतुकास्पद आहे आणि सदैव स्मरणात राहील, असे पाटील म्हणाले. पहाटेपासून कामाला सुरुवात करण्याची दादांची पद्धत आणि फाईल्सचा त्वरित निपटारा करण्याच्या कौशल्यामुळे प्रशासन गतिमान झाले, पायाभूत सुविधा, शेती आणि उद्योगांच्या संदर्भात त्यांनी घेतलेले निर्णय राज्याला प्रगतीपथावर नेणारे ठरले. तसेच ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून ते सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला, असे हेमंत पाटील म्हणाले.
















