मुंबई प्रतिनिधि : अजित दादा पवार गेले!
जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, महाराष्ट्राचे राज्याचे लोकप्रिय स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे.मन सुन्न होऊन महाराष्ट्र पोरका झाला आहे.
महाराष्ट्राचा दमदार आणि दिलदार नेतृत्व गमावले आहे. ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.
त्याकरिता दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
















