छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी : दि. २७/०१/२०२६ रोजी म.शि.प्र. मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालय (स्वायत्त), छत्रपती संभाजीनगर येथील जैवतंत्रज्ञान विभाग व शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने “संशोधन व संशोधन नीतिशास्त्र कौशल्य वृद्धी कार्यक्रम” या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (PM-USHA) योजनेअंतर्गत सॉफ्ट कॉम्पोनंट अंतर्गत आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे उद्घाटन प्रो. राम चव्हाण, प्राचार्य, मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी संशोधनातील नीतिशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करत प्रामाणिकता व शैक्षणिक सचोटी जपण्याची गरज व्यक्त केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. रवी पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात संशोधन व नीती याची सांगड घालत समाजोपयोगी संशोधनाचे महत्त्व विषद केले. संशोधनाचा प्रत्यक्ष समाजविकासाशी संबंध जोडणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेत खालील विषयाप्रमाणे संसाधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले –
डॉ. राहुल भगत – Research Excellence through Ethical Practice
डॉ. समाधान दहीकर – Global Research, Local Contexts: The Skill of Ethical Sensitivity in International and Cross Cultural Studies
डॉ. राजेश वर्मा – Statistics in Research
डॉ. राजेश कुमार – Research Avenue & Ethics in Forensic Science
कार्यक्रमास उपप्राचार्य प्रो. अपर्णा तावरे, डॉ. गणेश मोहिते, परीक्षा नियंत्रक डॉ. अनिलकुमार परदेशी, डॉ. विष्णू पाटील व डॉ. सुनील टेकाळे, जैवतंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख प्रा. महादेव जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुजा झिने, प्रा. देवकीराणी पवार व प्रा. पल्लवी मोहिते यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. शिवकृपा हलबाडगे यांनी केले.
विविध महाविद्यालयांमधील संशोधक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. चर्चासत्रे, प्रश्नोत्तर सत्रे व प्रात्यक्षिकांमुळे सहभागींची संशोधन प्रक्रियेबाबतची समज अधिक स्पष्ट झाली.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जैवतंत्रज्ञान विभागातील सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी कार्यशाळेची सांगता उत्साहात करण्यात आली.















