मुंबई: पिरामल फार्मा लिमिटेडचा विभाग असलेल्या पिरामल कन्झ्युमर हेल्थकेअर (पीसीएच) ने आपल्या बेबी केअर ब्रँड लिटल्स साठी ‘लाईफ इज हार्ड. स्विच टू सॉफ्टर’ ही नवी डिजिटल जाहिरात मोहीम सादर केली आहे. या मोहिमेत कथेच्या केंद्रस्थानी थेट बाळाला ठेवण्यात आले आहे.
ज्या क्षेत्रात बहुतांश संवाद पालकांशी टिप्स, मार्गदर्शन आणि चेकलिस्ट्सद्वारे साधला जातो, त्या ठिकाणी लिटल्स बाळाच्या अनुभवाकडे लक्ष वळवते. हा असा आवाज, अनुभव अनेकदा ऐकला जात नाही. ही कथा एका रोजच्या सत्यावर आधारित आहे. बाळ अनेकदा ते व्यक्त करू शकत नाहीत अशा अस्वस्थतेचा शांतपणे सामना करत असतात. मग ते खरबरीत डायपरमुळे त्यांना होणारा त्रास असेल, आंघोळीच्या उत्पादनांमुळे येणारा कोरडेपणा असेल किंवा या उत्पादनातल्या उग्र घटकांमुळे निर्माण होणारी संवेदनशीलता असेल. प्रौढांना या गोष्टी सामान्य, सर्वसाधारण वाटू शकतात, पण बाळासाठी याच अनुभवांमुळे जग किती सुरक्षित, दिलासा देणारे आणि संरक्षित आहे हे ठरते.
हा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी डिजिटल कथन लिटल्स फ्लफी सॉफ्ट डायपर्स, लिटल्स ऑर्गॅनिक्स मॉइश्चरायझिंग बेबी बाथिंग बार आणि लिटल्स ऑर्गॅनिक्स बेबी लोशन यांवर आधारित तीन फिल्म्सद्वारे उलगडते. बाळाच्या मनातील स्वगताच्या माध्यमातून सांगितलेल्या या फिल्म्स बाळाच्या दृष्टीकोनातून दैनंदिन प्रसंग दाखवतात. आराम जर कमी पडला तर अगदी साधे क्षणही किती अवघड वाटू शकतात हे यातून उलगडते. ही कथनशैली मायेची उब देणारी आणि आपुलकीची आहे. ती पालकांना थांबून विचार करायला प्रवृत्त करते की त्यांच्या छोट्या-छोट्या निर्णयांचा बाळाच्या आरोग्य आणि स्वास्थ्यावर किती खोल परिणाम होतो.
ही संकल्पना ब्रँडच्या सॉफ्ट, सेफ आणि सेन्सिटिव्ह या 3 एस तत्त्वज्ञानावर आधारित आहे.डायपर्स,वैयक्तिक निगा उत्पादने, फीडिंग उत्पादने, वाइप्स आणि खेळणी अशा संपूर्ण पोर्टफोलिओच्या विकासाला त्यातून दिशा मिळते. बाळांना होणारा त्रास, त्यांची चिडचिड कमी होईल, उग्र घटकांचा संपर्क टाळला जाईल आणि बाळाच्या नाजूक त्वचेचे तसेच विकसित होत असलेल्या इंद्रियांचे संरक्षण होईल अशा पद्धतीने प्रत्येक उत्पादन डिझाइन केलेले आहे. त्यामुळे ते व्यक्त करू न शकत नसलेली त्यांची रोजच्या दिवसाची अस्वस्थता कमी व्हायला मदत मिळणार आहे.
व्यावसायिक दृष्टीने पाहता, ‘लाईफ इज हार्ड. स्विच टू सॉफ्टर’ ही मोहीम लिटल्सच्या वाढत्या उत्पादन श्रेणीबाबत जागरूकता आणि वापर वाढवण्यास मदत करते, तसेच आधुनिक, डिजिटलदृष्ट्या सजग पालकांसाठी एक सर्वसमावेशक बेबी केअर ब्रँड म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करते. हे पालक आपल्या बाळांनी काय वापरले याबरोबरच ते काय अनुभवतात याबद्दलही अधिक जागरूक असतात.
पिरामल कन्झ्युमर हेल्थकेअरचे उपाध्यक्ष अभिषेक कुमार म्हणाले, “बेबी केअरविषयीचा संवाद पारंपरिकरित्या पालकांच्या दृष्टीकोनातून केला जातो. या मोहिमेद्वारे आम्हाला लक्ष बाळाकडे वळवायचे होते; जे प्रथमच जगाचा अनुभव घेत आहे. ‘लाईफ इज हार्ड. स्विच टू सॉफ्टर’ हे विधान विनोद आणि सह अनुभूतीसह ते सत्य मांडते. लिटल्समध्ये आमची उत्पादने सॉफ्ट, सुरक्षित आणि संवेदनशील असावीत यासाठीच तयार केली जातात, कारण छोट्या-छोट्या निवडीही बाळाच्या आराम आणि स्वास्थ्यावर मोठा प्रभाव टाकतात. या मोहीमेतून अधिक सौम्य, विचारपूर्वक आणि आजच्या पालकांसाठी अधिक सुसंगत अशी देखभाल सेवा निर्माण करण्याचा आमचा उद्देश दिसून येतो.”
या 3-भागांच्या एआय-निर्मित जाहिरात मोहिमेद्वारे लिटल्स या श्रेणीतील कथनशैलीला नवे रूप देते आणि बाळालाच प्रथम बोलू देते. हे बाळच पालकांना आठवण करून देते की जेव्हा लहानग्यांसाठी आयुष्य कठीण वाटते, तेव्हा अधिक सौम्य निवडी सगळा फरक घडवू शकतात.
लिटल्सची स्थापना 1980 च्या दशकात झाली. त्यांनी बेबी केअर क्षेत्रात एक विश्वासार्ह नाव म्हणून भक्कम वारसा निर्माण केला आहे. गेल्या तीन दशकांत हा ब्रँड भारतातील बेबी उत्पादनांपैकी एक अत्यंत प्रिय ब्रँड बनला असून भारतीय मातांचा विश्वास त्याने संपादन केला आहे. जन्मापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या बाळांसाठी आवश्यक असलेल्या विविध गरजा पूर्ण करणारी उत्पादने हा ब्रँड सादर करतो. वेगवेगळ्या जीवन टप्प्यांतील गरजांनुसार ही उत्पादने तयार केली जातात. त्याच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये डायपर्स, वाइप्स, फीडिंग, खेळणी आणि बाळासाठीची वैयक्तिक निगा उत्पादने यांचा समावेश आहे. ती पालकांकडून मोठ्या प्रमाणावर वापरली जातात आणि शिफारसही केली जातात. बाळांच्या स्वास्थ्य आणि वाढीसाठी विश्वासार्ह आणि उच्च दर्जाची उत्पादने देणारा ब्रँड म्हणून लिटल्सने आपली ओळख निर्माण केली आहे.















