नवी दिल्ली,25: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सन 2025 च्या ‘जीवन रक्षा पदक पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील श्रीमती रूपाली प्रतापराव कदम यांना अतुलनीय धैर्यासाठी ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाला आहे.
देशभरातील एकूण 30 व्यक्तींना यावर्षी जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहेत. यामध्ये 6 ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’ (मरणोत्तर), 6 ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ आणि 18 व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहेत.
















