छत्रपती संभाजीनगर,दि.२९(जिमाका)- सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग उपवने व उद्याने यांच्या वतीने शनिवार दि.१४ व रविवार दि.१५ फेब्रुवारी २०२६ रोजी ४६ व्या विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन व उद्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत व प्रदर्शनात अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन सहायक संचालक प्रसाद कडुलकर यांनी केले आहे.
इच्छुक स्पर्धकांसाठी प्रवेशिका देणे व स्विकारण्यासाठी देण्यात आलेला कालावधी याप्रमाणे-
पुष्प प्रदर्शन स्पर्धा दि.३ ते १२ फेब्रुवारी
उद्यान स्पर्धा दि.३ ते ९ फेब्रुवारी
उद्यान स्पर्धा ह्या उद्यानाचा प्रकार व आकार(क्षेत्रफळ) अशा वेगवेगळ्या गटांमध्ये असून स्पर्धेत भाग घेतलेल्या उद्यानांचे परीक्षण दि. १०ते ११ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येईल.
प्रवेशिका सहाय्यक संचालक, उपवन व उद्याने यांचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक विभाग, मध्यवर्ती इमारत(विस्तार) अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर येथे स्विकारण्यात येतील.
पुष्पप्रदर्शनाबाबत अधिक माहितीसाठी सहायक संचालक प्र्साद कडुलकर ८१६९३५४९९५, उद्यान पर्यवेक्षक बालाजी जवळे ८३९००९६६९८ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
















