छत्रपती संभाजीनगर, दि. २९(जिमाका) – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मतदानासंदर्भातील अडचणी व तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मतदार मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या कक्षासाठी ०२४०-२३३१०७७ हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून हा क्रमांक २४ तास × ७ दिवस मतदारांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे. मतदान यादी, नाव नोंदणी, दुरुस्ती, स्थलांतर तसेच मतदान प्रक्रियेबाबत कोणतीही अडचण असल्यास मतदारांनी या कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मतदारांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती संगीता राठोड यांनी आवाहन केले आहे.
















