छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, लोकनेते मा.ना. अजितदादा पवार यांना देवगिरी महाविद्यालयात श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा.शेख सलीम साहेब, मशिप्रचे सदस्य मा.दिलीपभाऊ चव्हाण, प्रशासकीय अधिकारी मा. प्रा.फुलचंद माळी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. विवेक जैस्वाल, प्राचार्य डॉ. रवी पाटील, उपप्राचार्य डॉ.अपर्णा तावरे, उपप्राचार्य डॉ.गणेश मोहिते, कुलसचिव डॉ. दर्शना गांधी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















