छत्रपती संभाजीनगर, दि.३० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लोकप्रशासन विभागातील वरिष्ठ प्राध्यापकय डॉ.सतीश दांडगे हे ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
या निमित्त मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली येत्या शनिवारी (दि.३१) रोजी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले सभागृहात दपारी चार वाजता सदर कार्यक्रम होईल. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ.दांडगे हे गेल्या ३६ वर्षापासून अध्यापन, संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. लोकप्रशासन विभागप्रमुख, अधिसभा सदस्य, मॉडेल कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले आहे.
















