शहापूर :- वासिंद जवळील वेहळोली गावातील एका विहीरीत पडलेल्या भेकर या वन्यप्राण्यास दोन तरुणांनी जिवदान दिले आहे.वेळीच विहीरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने भेकराचे प्राण वाचले आहेत.
आपल्या कळपातून जंगलातून भटकलेले एक नर जातीचे भेकर रविवार दुपारी वेहळोलीतील गाव वस्तीत शिरले हे भेकर भटकत असताना ते एका विहीरीत पडले होते.ही घटना समजताच गावकऱ्यांनी विहीरी जवळ धाव घेत मदतकार्य सुरू केले.विहीरीत पडलेले भेकर पाण्यात बुडण्याची शक्यता दिसत असल्याने यावेळी गावातील तरुण प्रितम भोईर व मनिष भोईर यांनी वेळ न दवडता पुढाकार घेत मदतकार्य सुरू केले यावेळी दोर विहीरीत सोडून दोराच्या साहाय्याने भेकराला कोणतीही इजा होऊ न देता अगदी सुरक्षितपणे विहीरीतून या दोन्ही तरुणांनी बाहेर काढून जवळील जंगलात भेकर सोडून दिले.या दोन्ही तरुणांनी दाखविलेल्या तत्परतेने एका वन्यजीवाचे प्राण वाचले असून त्यास जिवदान मिळाले आहे.
















