दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सिकंदराबाद येथील न्यू भोईगुडा, रेल कलारंग येथे आयोजित 70 व्या रेल्वे सप्ताह समारंभात एकूण चार प्रतिष्ठेचे कार्यक्षमता शिल्ड्स मिळवून विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
नांदेड विभागाने ब्रिजेस (पूल) तसेच रेल मदत या दोन्हीं शिल्ड्स पटकावले आहेत. तसेच, समपातळी क्रॉसिंग निर्मूलन या श्रेणीत गुंतकल विभागासोबत आणि सर्वोत्तम देखभाल केलेल्या वैद्यकीय मदत व्हॅन (MRV) साठी विजयवाडा विभागासोबत संयुक्त शिल्ड मिळवले असून, एकूण चार प्रमुख शिल्ड्स विभागाच्या खात्यात जमा झाल्या आहेत.
याशिवाय, वैयक्तिक उत्कृष्टतेची दखल घेत उत्कृष्ट योगदानाबद्दल एका अधिकाऱ्यास व सात कर्मचाऱ्यांना “विशिष्ट रेल सेवा पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.:
1. श्री व्ही. सुजीत कुमार, वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय)
2. श्री भरत गुर्जर, वाणिज्य निरीक्षक
3. श्री संजय श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय अभियंता, नांदेड
4. श्री उत्तम कुमार, वरिष्ठ विभागीय अभियंता (पथ)
5. श्री पंकज कुमार, वरिष्ठ विभागीय अभियंता (वर्क्स)
6. श्री के. अजित दास, वरिष्ठ विभागीय अभियंता (पथ)
7. श्री नवीन प्रजापती, तंत्रज्ञ श्रेणी–II
8. श्री राजेश वडक्केरथ, मुख्य लोको निरीक्षक
ही कार्यक्षमता शिल्ड्स नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले यांनी संबंधित शाखा अधिकाऱ्यांसह दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री संजय कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभात स्वीकारल्या. वैयक्तिक पुरस्कारही महाव्यवस्थापकांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
हे यश नांदेड विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा, मालमत्ता देखभाल, प्रवासी सेवा आणि कार्यक्षमता उत्कृष्टतेसाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांचे, संघभावनेचे व कटिबद्धतेचे प्रतीक आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
















