सिल्लोड (प्रतिनिधी-)राज्य परिवहन महामंडळाच्या सिल्लोड आगारामधील चालक नारायण पुंडलिक काकडे तसेच वाहक विठ्ठलसिंग रायसिंग जारवाल हे प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले ,या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारसमारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगारप्रमुख विजय काळवणे हे होते, चालक नारायण काकडे यांनी भारतीय सैन्यदलात वीस वर्ष सेवा बजावून ते परिवहन महामंडळात रूजू झाले या दुहेरी सेवेबद्दल कौतुक करून परिवहन मंडळातील प्रामाणिक सेवेबद्दल काकडे व वाहक जारवाल यांचा आगारप्रमुख विजय काळवणे यांचेहस्ते स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी सहाय्यक वाहतूक अधीक्षक विकास चव्हाण, वाहतूक निरिक्षक किरण अवसरमल,एच.एम हरिओम शेळके, स.वा.नि शरद भिवसने यांच्या विशेष उपस्थितीसह ,बी .पी.पंडीत,वा. नि नवलसिंग ठाकूर, , बद्रीनाथ भालगडे,सोमेश सपकाळ निवृत्ती सपकाळ ,,रवींद्र डेरे, , चालक रामू मगर, राजू कोलते,जी. एम. केणेकर, रत्ना पाटील,ज्योती कानडजे अश्विनी सोनवणे यांच्यासह असंख्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. पी. पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन कवी बद्रीनाथ भालगडे यांनी केले.
















