पुणे ता. ६ :- डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ वनंद ता दापोली जिल्हा रत्नागिरी येथे दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध प्रबोधनात्मक व अभिवादन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे,निबंधक विशाल लोंढे,विस्तार व सेवा विभागप्रमुख डॉ बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली वनंद तसेच पुणे येथील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक तसेच बार्टी मुख्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वनंद येथे बार्टी संस्थेच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांवरील मौल्यवान ग्रंथ सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या बुक स्टॉलचे उद्घाटन बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे,भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
भीमशाहिर शहिद खेरटकर निर्मित क्रांतीचे पाऊले तसेच
“मी रमाई बोलतोय”
हे एकपात्री नाटक कु.प्रेरणा खरात लिंगेकर या सादर करतील.
बार्टीवतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहान विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ बबन जोगदंड यांनी केले आहे.















