छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान व अॅनिमेशन विभाग तसेच Plexus Pvt. Ltd. यांच्या संयुक्त विद्यमाने PM-USHA योजनेअंतर्गत “संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण” या विषयावर विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रो. सचिन देशमुख संगणक शास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. रवी पाटील होते.कार्यक्रमास उपप्राचार्य प्रो. अपर्णा तावरे, डॉ. गणेश मोहिते,डॉ. विष्णू पाटील , डॉ. सुनील टेकाळे,डॉ. रितेश मगरे, श्री. कुलदीप पाटील , श्री. चैतन्य डहाळे,सौ. स्नेहल कुलथे Nits pvt .Ltd. नाशिक यांची उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी प्रो. सचिन देशमुख यांनी संगणकीय विचारसरणी व डेटा विश्लेषणाचे सध्याच्या शिक्षण व उद्योग क्षेत्रातील महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात प्रो. रवी पाटील यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर कौशल्यविकास आवश्यक असल्याचे नमूद केले.
या तीन दिवसीय कार्यक्रमात संगणकीय अध्ययन, डेटा विश्लेषण व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित करिअर इन डेटा सायन्स ,मशीन लर्निंग , जेनेरेटिव्ह ए आय , डेटा विसुलीझशन टूल्स,रिअल लाइफ केंस स्टडीस इन डेटा सायन्स अशा विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे संयोजन डॉ. रितेश मगरे , विभागप्रमुख – संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान व अॅनिमेशन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार नंदिनी वाटवे व शरली सिंग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील प्राध्यापक व कर्मचारी दीपाली महाजन, अंजुम शेख,गिरीश दुधगावकर ,भूषण कुलकर्णी, गणेश कृष्णपक्षी, अमित शिंदे , सागर त्रिभुवने, कृष्णा म्हस्के यांचे सहकार्य लाभले.















