छत्रपती संभाजी नगर : आग्नेय किड्स इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन म्हाडा कॉलनी येथे करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. डी.बी. खिल्लारे, डॉ. इंगळे, अरविंद अवसरमोल,किसन सरकटे, प्रा. मिलिंद अवसरमोल, संचालिका भारती अवसरमोल हे उपस्थित होते. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या प्रा. सोनाली अवसरमोल यांनी केले, तर प्राध्यापक मिलिंद यांनी प्रास्ताविक मांडले , यातून स्नेहसंमेलन कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व शाळेच्या शैक्षणिक वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमाचा आढावा सादर केला. त्याचप्रमाणे ॲड. डी.बी.खिल्लारे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कौशल्यपूर्ण, कलागुण विकसीतपूर्ण शिक्षण मिळणे महत्वाचे आहे, शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, हा उद्देश समोर ठेवून आपण शिक्षण दिले तर नक्कीच शिक्षणाचे महत्त्व लक्षात येईल असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती गाणे विविध कलागुण सादर केले, त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले,
शेवटी संचालिका भारती अवसरमोल यांनी मान्यवरांचे आभार मानले. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक आणि पालक उपस्थित होते.
















