छञपतीसंभाजीनगर प्रतिनीधी – खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार येथे उदया दिनांक ०९ फेबु्रवारी रोजी भगवान शांतीनाथ यांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला ४७ वर्ष पुर्ण होत आहे या निमीत्त्ताने मुनिश्री प्रभावसागरजी महाराज यांच्या सानिध्यात विविध धार्मिक कार्यकम करण्यात येनार आहे. या संपुर्ण कार्यकमाला सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्रबाबुजी दर्डा हे समारोह अध्यक्ष म्हणुन उपस्थित राहणार आहे तसेच विशिष्ट प्रमुख अतिथी म्हणुन ना.अतुल सावे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी सकल जैन समाजाचे सर्व उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. नवनिर्वाचित महापौर समिर राजुरकर व उपमहापौर राजेंद्र जजाळ यांचा व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ होणार आहे. अशी माहिती पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी, सचिव प्रकाश अजमेरा यांनी दिली आहे.
सर्व प्रथम ४७ व्या वर्धापन दिवसाचे औचित्य साधुन सकाळी ७.१५ वाजता धर्मध्वजारोहनाने कार्यकमाला सुरâवात होणार आहे. तदनंतर ७.३० वाजता भगवान शांतीनाथांचा संगीतमय पंचामृत अभिषेक रूपाली रावका यांच्या सुमधुर संगीतात होणार आहे. तदनंतर ८.१५ वाजता मुनिश्री प्रभावसागरजी महाराज यांचे विशेष प्रवचन होणार आहे. तसेच ९.०० वाजता संगीतमय शांतीविधान होणार आहे. शांतीविधनात बसणा-या भाविकांची लक्की ड्रॉ पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित भाविकांना सुभाषचंद शकुंतला धिरज सपना मयुर पुजा चेतन चिराग पाटणी परिवार व धिरज पाटणी मित्र मंडळ व राजेंद्रकुमार मोहितकुमार पहाडे परिवाराच्या वतीने महाप्रसादीचे वाटप करण्यात येणार आहे. संध्याकाळी ७ वाजता भगवान शांतीनाथांची संगीतमय महाआरती नमोकार भक्ती मंडळाच्या साग्र संगीतामध्ये संपन्न होणार आहे. संपुर्ण कार्यकमाला मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार चें अध्यक्ष महावीर पाटणी, सचिव प्रकाश अजमेरा यांच्यासह विश्श्वस्थ मंडळाने केले असल्याची माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी दिली आहे.
सन १९७९ साली आचार्य सिध्दसेनसागरजी महाराज यांच्या सानिध्यात राजाबजार येथे भगवान शांतीनाथांचा मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. तेव्हापासुन छत्रपती संभाजीनगर खंडेलवाल दिगंबर जैन समाजाची नेत्रदिपक प्रगती झाली. आज हा समाज आदर्श समाज म्हणुन ओळखला जातो. संपुर्ण भारता मध्ये छत्रतपती संभाजीनगर जैन समाजाची एक आगळेवेगळी प्रतिमा समोर अशा या चमत्कारीक शांतीनाथ भगवंताच्या प्रतिमेचे दर्शन घेताना मनामध्ये शांती व अलौकीक असा प्रकाश होतो अशी या मंदिराची ख्याती आहे.
















