पैठण प्रतिनिधी :-
प्रशासकीय इमारत संतपिठ पैठण या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने 9 निवडणूक विभागाची 18 निर्वाचक गणांची मतमोजणीसाठी श्री प्रवीण फुलारी निवडणूक निर्णया अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 09 02 2026 रोजी होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे नियोजनबद्ध व बंदोबस्तामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी दिनांक 09 02 2026 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता सुरू होणार आहे त्यासाठी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला मतमोजणी पूर्वतयारी पूर्ण झालेले असून या कामी नायब तहसीलदार श्री प्रभाकर घुगे राहुल बनसोडे कैलास बहुरे कृष्णा मशरूम नाय तहसीलदार निवडणूक श्रीमती वैशाली कांबळे श्री अमोल पाखरे श्री रेवननाथ खेडकर श्री गणपत मिटकर श्री दादासाहेब गटकळ श्री वैभव सोनवणे श्री सागर आंदुरे श्री अमीर शेख श्री इमरान शेख यांचे सहकार्य आहे
















