छत्रपती संभाजी नगर, दि.९: महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कुलगुरू क्रिकेट टी ट्वेंटी (T-20 ) चषक २०२६ स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी संघाने तृतीय पारितोषिक जिंकले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कुलगुरू क्रिकेट T-20 चषक २०२६ स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेत विद्यापीठाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्तबद्ध कामगिरी व क्रीडावृत्तीचे दर्शन घडवून हे यश संपादन केले. या यशामागे विद्यापीठ प्रशासनाचे मोलाचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले.
या स्पर्धेत सहभागी होण्याची व आपली क्रीडा गुणवत्ता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, क्रीडा संचालक डॉ. सचिन देशमुख तसेच प्रभारी वित्त व लेखाधिकारी डॉ.संजय कवडे, परीक्षा मंडळ संचालक डॉ.बी एन डोळे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ कैलास पाथ्रीकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे क्रीडा क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ओळख अधिक भक्कम झाली असून, भविष्यातील आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.
*संघ पुढीलप्रमाणे:*
जितेंद्र पाटील या संघाचे कर्णधार तर रवींद्र खताळ यांनी उपकर्णधार म्हणून काम पाहिले. या संघात जय देशमाने, नितीन गायकवाड, रवींद्र पारधी, बलभीम मरकड, कार्तिक चव्हाण, अन्वर खान, तन्वीर अहेमद, कृष्णा बहिरम, रोहित गायकवाड, रोहित सलामपुरे, सचिन गायकवाड व मनोज शेटे यांचा सहभाग होता.
*आजचा सामना*
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या मध्ये तृतीय परितोषिका साठी झालेल्या सामन्यांमध्ये आपल्या विद्यापीठ संघाने 170 धावा केल्या असुन व MUHS या टीमने धावांचा पाठलाग करताना 18.2 ओव्हर मध्ये 54 धावा बनवु शकले
यामध्ये जितेंद्र पाटील यांनी 48 बॉल मध्ये 54 धावा केल्या व बलभीम मरकड यांनी 21 बॉल मध्ये 54 धावा केल्या तसेच गोलंदाजी मध्ये कार्तिक चव्हाण यांनी 4 ओव्हर मध्ये 04 रन देऊन 5 विकेट घेतल्या असून सामनावीर चा ‘किताब पटकावला आहे तसेच सर्वच खेळाडूंनी अथक परिश्रम घेऊन बॉलिंग व batting केली आहे.
















