पुणे ता. ९ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे संस्थेच्या वतीने त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वणंद (ता. दापोली) येथे ७ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सामाजिक जनजागृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून माता रमाई यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे नेटके नियोजन ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे,विस्तार व सेवा, प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ.बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.जयंती महोत्सवाचे औचित्य साधून नागरिकांसाठी सवलतीच्या दरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे व इतर महापुरुषांचे मौल्यवान ग्रंथ,पुस्तके अनुयायांना उपलब्ध करून देण्यात आली होती,या पुस्तक विक्री दालनाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस एस.के.भंडारे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरलेल्या “मी रमाई बोलते” या एकपात्री प्रयोगातून प्रेरणा खरात यांनी माता रमाईंचा संघर्षमय जीवनप्रवास जिवंत केला.यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू वाहिले. त्यानंतर शाहीर शाहिद खेरटकर आणि त्यांच्या संचाने “क्रांतीची पाऊले” या संविधान व भीमगीतांच्या कार्यक्रमातून उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. यावेळी बोलताना भीमराव आंबेडकर यांनी रमाईच्या कार्यावर प्रकाश टाकला व बार्टीच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले .
तसेच बार्टी आयोजित रमाई जयंती उत्सव उत्कृष्ट केल्याचे सांगितले.प्रारंभी विभागप्रमुख डॉ.बबन जोगदंड यांनी प्रास्ताविक करतांना बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्टी रमाईच्या कार्याचा गौरव करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून रमाईच्या संघर्षमय जिवनातील अनेक घटनांचे संशोधन करण्यासाठी संशोधन प्रकल्प हाती घेतल्याचे सांगितले.
या प्रसंगी भन्ते सुमेध बोधी,भंते कौडिण्य,भंते सारिपुत्र,भंते आनंद,भंते प्रज्ञाज्योती,रत्नागिरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी,दापोलिचे पोलीस निरीक्षक तोरसकर,सरपंच संजना दैवघरकर,पोलिस पाटील सोनाली काटे,बार्टीचे
प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात,विकास गायकवाड, धिरज खाडे,उषा भिंगारे,जागृती गायकवाड,ज्योती झांजरे,माधुरी सोनवणे,राजर्षी कांबळे,रामदास लोखंडे,राहुल कवडे,प्रियदर्शनी माने,पूजा वायदंडे, माहेश्वरी विचारे,धनश्री अवसरे,सुश्मिता वाघमारे,गौरी सोनवणे,अमीर मुलानी, आकाश कु-हाडे,कमलेश कुटे,अक्षय ढमाले,शंकर माने अशोक साबळे,भिसे,चेतन ढवळे,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे,समतादूत तसेच वनंद गावातील वनंदकर भावकी मधून दीपक धोत्रे अतिष धोत्रे ,सुभाष धोत्रे,संजय धोत्रे, संतोष धोत्रे,प्रज्ञा कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी,समता सैनिक दलाचे सैनिक,बार्टीचे कर्मचारी अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच राज्यभरातुन अभिवादन करण्यासाठी आलेले अनुयांयी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.वणंद परिसरातील नागरिकांनीही या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
















