छत्रपती सभाजीनगर परमपूज्य 108 आचार्य विद्यासागर महाराज यांचे परम शिष्य निर्यापक मुनी नियमसागर महाराज व सुपार्श्वसागर महाराजांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जैन गुरुकुल वेरूळ येथे प्रशालेतील भव्य अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त प्रयोगशाळा व विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय कक्षाचे यावेळी उद्घाटन करण्यात आले तसेच गुरुकुल मध्ये चातुर्मासानिमित्त येणाऱ्या त्यागी जणांसाठी भूमी अंतर्गत एक लाख लिटर जलकुंभ उभारण्यासाठीचे भूमिपूजन तसेच जैन आयटीआय मध्ये नवीन इलेक्ट्रिकल ट्रेड चे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजी नगर येथील डॉ पीएम दरक ज्योती गंगवाल महावीर पाटणी प्रकाश गंगवाल अमोल पुणेकर सुयोग पाटोदी देवेंद्र शेठ प्रकाश पापडीवाल संस्थेचे अध्यक्ष दिनेश गंगवाल महामंत्री प्रेमचंद पाटणी कोषाध्यक्ष सुमित ठोले मार्गदर्शक वर्धमान पांडे सहमंत्री गौतम ठोले शालेय अध्यक्ष मदनलाल पांडे सदस्य निर्मल कुमार ठोले मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर पर्यवेक्षक सुकुमार नवले बाल ब्र मनिष भैय्या रानु जैन यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी 11 वी 12वी महाविद्यालय कक्षाचे उद्घाटन जायंट ग्रुप ऑफ चिकलठाणा संभाजीनगर चे अध्यक्ष देवेंद्र सेठ व विष्णू राऊत यांच्या हस्ते करण्यात आले भूमी अंतर्गत जल कुंभाचे भूमी पूजन अमोल पुर्णेकर व सुयोग शीतलकुमार मदनलाल पाटोदि तर जैन आई टी आय चे ट्रेड उद्घाटन महावीर पाटणी,प्रकाश गंगवाल व नवीन प्रयोग शाळेचे उद्घाटन डॉ पी एम दरख व डॉ प्रकाश पापडीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी परम पूज्य नियमसागर महाराज यांचे सर्व विद्यार्थ्यांना व श्रावक श्राविका ना मांगलिक उद्बोधन करण्यात आले. अशी माहिती अतुल बादे सुहास मिश्रीकोटकर नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यानी दिली
















