मा.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची उपस्थिती
मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा
हजारो पदवीधारकांची मेळाव्यास उपस्थिती
दीड हजार जांगासाठी ४५ कंपन्यांकडून मुलाखती
छत्रपती संभाजीनगर, दि.११ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित ’मेगा जॉब फेअर’चे उद्घाटन जिल्हाधिकारी मा.दिलीप स्वामी यांच्या हस्ते करणार आले. मेळाव्यास पदविका, पदवी व पदव्यूत्तर पदवीधारक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (दि.११) मेगा जॉब हेअर चे आयोजन करण्यात आले.सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , सी. आय. आय. तसेच मॅनयुनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी महोत्सव घेण्यात आला. मा.कुलगुरु डॉ.विजय फुुलारी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उपायुक्त विद्या शितोळे, सहाय्यक आयुक्त राजु वाकुडे, रोजगार व उद्योजकता अधिकारी सुरेक्षा बहुरे, मॅन युनाटेड कॉर्पोरेटचे रवींद्र कांगराळकर, प्लसमेंट ऑफीसर डॉ.गिरीश काळे यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी जॉब फेअरमध्ये सहभागी कंपन्यांचे एच आर, मॅनेजर उपस्थित होते. या नोकरी महोत्सवात ४५ वँâपन्यामधील सुमारे दीड हाजर कंपन्यासाठी मुलाखती घेण्यात येत असल्याचे उपायुक्त विद्या शितोळे यांनी सांगितले. तर मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्लेसमेंट ऑफीसर डॉ.गिरीष काळे म्हणाले. डॉ.गिरीष काळे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.संजय शिंदे यांनी आभार मानले.
४५ कंपन्यांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई येथील नामांकित कंपन्या या जॉब फेअर मध्ये सहभागी झाल्या. विविध पदविका, पदवी तसेच पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता या जॉब फेअर मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर येथील टोयोटा किर्लोसकर मोटर, अथर एनर्जी, पर्किन्स इंडिया, ऋचा इंजिनिअर्स, मेडी-रिक्रूटर, कल्याण ज्वेलर्स, कॉस्मो फिल्म्स, क्लॅड मेटल इंडिया , बागला गृप ऑफ इंडस्ट्रीस, एस एस कंट्रोल, मेटलमॅन ऑटो, एल. आय. सी., इंस्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एक्सीडी इंडिया लि., शॉपर्स स्टॉप प्रा. ली. (प्रोझोन), ज्ञानदीप फाउंडेशन सेंटर, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी प्रा. ली., के आर बेदमुथा टेक्नो असोसिएटस या प्रख्यात कंपन्या तसेच इ तरही काही आशा पंचेचाळीस (४५) कंपन्या दीड हजर रोजगार संधी सहित सहभागी झाल्या. बुधवारी सकाळी ९ वाजेपासून नाव नोंदणी सुरु करण्यात आली. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर मुलाखती घेण्यात येत आहेत.
’स्किल बेस्ड’ ज्ञानासाठी मोठया रोजगार संधी : मा.जिल्हाधिकारी
शासकीय नोक-यांपेक्षाही खासगी कंपन्या मध्ये नोकरीच्या संधी मोठया प्रमाणावर आहेत. त्यातही ’स्किल बेस्ड’ पदविका, पदवीधरकांनी आपल्या क्षमतेच्या संपुर्ण वापर करुन रोजगार मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मा.दिलीप स्वामी यांनी केले. तसेच राज्य व केंद्राशासनाच्यावतीने रोजगार, स्वयंरोजगार संदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
कंपनीचा मालक होण्याचे स्वप्न बाळगा : मा.कुलगुरु
आपण ज्या कंपनीत नोकरी मागतो आहोत, तसाच पध्दतीची स्वतःची कंपनी एक दिवस स्थापन करुन लोकांना रोजगार देण्याचे स्वप्न बाळगा, असे आवाहन मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी केले. मोबाईच्या स्क्रिनवर गरजेपेक्षा जास्त वेळ दवडू नका, असेही ते म्हणाले. सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष मुलाखतींना सुरुवात झाली.
















