पुणे ता. १० डॉ.बाबासाहेबांच्या या सामाजिक लढ्यात रमाईने खंबीरपणे साथ दिली.रमाईचा त्याग खूप मोठा होता.अनेक संकटावर मात करून रमाईने बाबासाहेब परदेशात असताना आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला.त्यांनी दिलेल्या पाठबळामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर घडले.
बार्टी रमाईच्या संघर्षमय जीवनातील अनेक पैलूंचे बार्टीच्या वतीने संशोधन चालू असून यावर लवकरच रमाई संशोधन ग्रंथ बार्टी प्रकाशित करणार असल्याचे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी रमाई जयंती महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, पुणे येथे दिनांक १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत रमाई महोत्सवाचे आयोजन संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी केले होते.
रमाई महोत्सवाच्यावतीने महासंचालक सुनील वारे यांचा रमाई ग्रंथ, पंचशिलेची शाल शाल भेट देऊन सन्मानित
करण्यात आले.
यावेळी माजी आमदार दीपक पायगुडे,राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे,माजी नगरसेविका लताताई राजगुरू,रमाई महोत्सवाचे अध्यक्ष प्रमोद आडकर,सचिन इटकर,मानसीताई वानखेडे,बार्टीच्या रजनी वाघमारे,विनायक भालेराव, शितल बंडगर वैशाली खांडेकर,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर,रमाईच्या लेकी उपस्थित होत्या.
बार्टी संस्थेच्या वतीने रमाई जयंती महोत्सवात दिनांक १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांचे मौल्यवान ग्रंथ अनुयायांना विनामूल्य भेट देऊन बार्टीच्या योजनेची माहिती समतादुत यांनी दिली.
बार्टी मुख्यालयात रमाई तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि रमाई पुतळ्यासही मा महासंचालक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच रमाईचे जन्मस्थळ वनंद ता दापोली जिल्हा रत्नागिरी येथे बार्टी संस्थेच्या वतीने विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ बबन जोगदंड यांच्या उपस्थितीत अभिवादन व प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
















