छत्रपती संभाजीनगर, दि. 11 (प्रतिनिधी) – समर्थनगर येथील रहिवासी अॅड. विजया वसंतराव डंख (80) यांचे मंगळवार, 10 रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा बुधवार, 11 रोजी सकाळी प्राईड सेंचुरी, पन्नालालनगर येथून निघून त्यांच्यावर पार्थिवावर पुष्पनगरी येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्या मातोश्री वृद्धाश्रम समर्थनगर येथे विश्वस्त, आणि बार असोसिएशनच्या सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई कर्नल पी. हरेश कुमार, नातंवंडे असा परिवार आहे. अॅड. सचिन डंख, अॅड. आशुतोष डंख यांच्या त्या मातोश्री होत.
अंत्यसंस्कार समयी माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी खासदार चंद्रकांत खैरे, मंत्री अतुल सावे यांच्यावतीने अनिल सावे, अजित सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक सचिन खैरे, विधिज्ञ टी. के. प्रभाकरन, तसेच बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, डॉ. पवन डोंगरे, अभय टाकसाळ, उपजिल्हाअधिकारी सोहम वायाळ, उद्योजक नितीन बगाडिया, आशिष कटारिया, डॉ. सातारकर, डॉ. आनंद डंख, डॉ. दिलीप मुळे, डॉ. समिध पटेल, डॉ. ए. जी कुलकर्णी, डॉ. बेलसरे, डॉ. कहाळेकर तसेच राजकीय व सामाजिक, शैक्षणिक, विधी, औद्योगिक, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.
















