वैजापूर – कृषि उत्पन्न बाजार समितीचे शिंदे सेनेचे सभापती रामहरी जाधव यांच्याविरुद्ध तेरा संचालकांनी दोन फेब्रुवारीला जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केलेला अविश्वास ठराव बुधवारी प्राधिकृत अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांच्या अध्यक्षतेखाली येथील बाजार समितीच्या सभागृहात आयोजित विशेष सभेत तेरा विरुद्ध शून्य मतदानाने मंजुर करण्यात आला. रामहरी जाधव हे शिंदे सेनेचे संचालक आहेत. अविश्वास ठराव मंजुर झाल्याने त्यांना आता पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. संचालकांना विश्वासात न घेणे, विषय पत्रिकेवरील विषय सोडून अन्य विषयावर चर्चा करणे, याबाबत असलेल्या आक्षेपकडे किंवा तक्रारीकडे दुर्लक्ष करणे या कारणावरून त्यांच्याविरुध्द संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या बैठकीला सभापतीसह पाच संचालकांनी गैरहजरी लावली. चोख पोलीस बंदोबस्तात ही विशेष सभा घेण्यात आली.
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद वं पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची राजकीय खेळी मानली जात असून यात भारतीय जनता पक्षाचे समितीतील प्राबल्य निवडणूक निकालानंतर वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिंदे सेना साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवकन्या पवार, काकासाहेब पाटील, अविनाश गलांडे, कल्याण दांगोडे, ज्ञानेश्वर जगताप, अनिता वाणी, प्रशांत सदाफळ, रजनीकांत नजन, गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, विजय ठोंबरे, शेख रियाज शेख अकिल व बाबासाहेब गायकवाड या तेरा संचालकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. तर सभापती रामहरी जाधव, संजय निकम, कल्याण जगताप, प्रवीण पवार व गोरख आहेर हे बैठकीला गैरहजर राहिले उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांना सहाय्यक निबंधक के एम चौधरी सचिव प्रल्हाद मोटे व सहाय्यक सचिव एस. के. निकम यांनी सहकार्य केले.
फोटो सह
















