पैठण प्रतिनिधी :- नाथषष्टी यात्रेच्या अनुषंगाने शहरातील कोर्ट रोड काळी पिवळी पॉईंट जवळ काढण्यात येणाऱ्या अतिक्रमण ठिकाणी एका व्यापाऱ्याचा नगरपरिषद अतिक्रमण हटाव पथक तथा पोलीस पथकासोबत झालेल्या वादाचा व्यापारी संघटनेने विरोध दर्शवत पैठण बंद केले असता न.प.च्या वतीने अतिक्रमण हटाव मोहिमेला शुक्रवार आठवडी बाजारासोबत एकादशी आल्याने दोन दिवसांचा ब्रेक दिला. तिसऱ्या दिवशी मात्र ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ पल्लवी अंभोरे यांनी दिली. व्यापारी बांधवांनी आपापले अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन ही डॉ अंभोरे यांनी केले आहे.
राज्यातील क्रमांक दोनची सर्वात मोठी यात्रा म्हणून नाथषष्टी यात्रा प्रसिद्ध असून मार्च ९ ते ११ दरम्यान ही यात्रा भरणार आहे. यात्राकाळात भाविकांना त्रास होऊ नये म्हणून शहरातील अतिक्रमण काढून घ्यावे करीता ५ फेब्रुवारी पासून ध्वनीक्षेपा मार्फत सूचना देण्यात येत होत्या त्यावरून बुधवारी प्रत्यक्ष रित्या पोलीस बंदोबस्तात जिसेबी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने अतिक्रमण निष्काशीत करण्यास सुरुवात करण्यात आली होती. गुरुवारी ही मोहीम बसस्थानक परिसर कोर्ट रोड, नाका टू नाका भागात सुरु असतांना कोर्ट रोडवरील मधुसूदन मुंदडा यांच्या किराणा दुकानासमोरील पत्राचे शेड काढणं असतांना त्यांचा व अतिक्रमण हटाव पथक व पोलिसांचा वाद सुरु झाला या वादात पोलिसांनी अती केल्याचा ठपका ठेवत व्यापारी संघटनेने शहरात फिरून पैठण बंद करून अतिक्रमण मोहिमेला तीव्र विरोध करत पोलिसांच्या भूमिकेबद्दल तहसीलदार यांना निवेदन दिले.अतिक्रमण हटाव मोहिमेला आमचा विरोध नसून न.प.अतिक्रमण हटाव पथक गाईडलाईन सोडून लोकांच्या खासकी जागेत अतिक्रमण असल्याचे सांगत कारवाई करत आहे.मुळात व्यापारी बांधवांनी आपल्या जागेतच आस्थापाना मागे घेऊन त्यापुठे पार्किंकची सोय केली आहे. तसेच प्रशासनाने प्रतिष्ठित व्यापारी मुधुसूदन मुंदडा यांना दिलेल्या वागणूकीचा आम्ही विरोध करत असल्याची प्रतिक्रिया व्यापारी संघाचे अध्यक्ष स्वदेश पांडे यांनी दिली. यानंतर काही राजकीय मंडळींनी घटनेचे निषेध करत अतिक्रमण मोहीम तूर्तास मागे घेतल्या असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरवले. यात्रा परिसरासह शहरातील रस्ता लगत मोठया प्रमाणात अतिक्रमण झाले असून तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांना याचा त्रास होते. नेमकी न. प. ने अतिक्रमण विरोधी चांगली मोहीम सुरु केली असता त्यात राजकीय हस्तक्षेप होऊन ही मोहीम दाबवल्या जाणार असल्याची चर्चा आहे.
















