छत्रपती शिवाजी महाराज जयंती
सात प्रकारच्या स्पर्धा होणार
छत्रपती संभाजीनगर, दि.१२ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्यावतीने १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यासनाचे संचालक डॉ.पुरुषोत्तम देशमुख यांनी दिली.
छत्रपती शिवजयंती निमित्त मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सल्लागार मंडळाची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये शिवचरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा (दि.१२) गुरुवारी घेण्यात आली तर दुरदृष्टीचा महामेरु : छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर वत्तृâत्व स्पर्धा (दि.१३), ’छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व समावेशक कल्याणकारी निती’ या विषयावर दि.१४ फेब्रुवारी रोजी निबंध स्पर्धा घेण्यात येईल. तर ’छत्रपती शिवरायांच्या स्वराज निर्मितीत मावळयांचे योगदान’ या विषयावर शोधनिबंधाचे सादरीकरण (दि.१६) करण्यात येणार आहे. ’स्वराज्य निर्मितीतील व्यक्ती व घटना’ या विषयावर (दि.१८) रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला विद्यापीठ नाटयगृहात शाहीर राजेंद्र कांबळे यांचा पोवाडयाचा कार्यक्रम होणार आहे. तर शिवजयंती दिनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक तसेच प्रख्यात वक्ते डॉ.केदार फाळके यांचे व्याख्यान होणार आहे. याच कार्यक्रमात पारितोषिकांचे वितरण करण्यात येईल. या सर्व स्पर्धा तसेच कार्यक्रमांना विद्यापीठ पदव्यूत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक डॉ.वैâलास अंभुरे व अध्यासन केंद्राचे संचालक डॉ.पुरुषोत्तम देशमुख यांनी केले आहे.















