भोकरदन :- **भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भायडी येथे बालधमाल 2026 हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील असंख्य शिक्षकांसह पालक व रसिक मंडळींची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, हिंदी मराठी गाणी ,एकांकिका ,एकपात्री यासह दारूबंदी ,स्वच्छता अभियान ,अंधश्रद्धा पाणीवापर, यासारख्या सामाजिक विषयांवर विविध अभिनय व कलाकृती सादर करून रसिकांचे मनोरंजन केले. एकापेक्षा एक सरस अभिनय व नृत्यकलेने रसिकांना खळखळून हसवले.या कार्यक्रमासाठी सरपंच रेखा जंजाळ,उपसरपंच गंगा दसपुते, विष्णू जंजाळ, कृष्णा जंजाळ,रुख्मण फरकाडे,केंद्रप्रमुख डी.पी. वाघ, प्रा.नंदकुमार गिऱ्हे,चेअरमन संतोष इंगळे, शेनफड नेव्हार,प्रदीप इंगळे आर्यन इंगळे ,विठ्ठल घायाळ , भास्कर कढवणे , पुंडलिक सोनूने,नारायण तेलंग्रे, भगवान देठे, विठ्ठल गायकवाड, डी.एम.जाधव,वसंतराव देशमुख ,अरुण बावस्कर, संजय वाघ ,सीमा जाधव , सविता कालभीले, जिजा वाघ, हिंमत बोर्डे,नरेंद्र गिरी ,चंद्रकांत वड्डे,समाधान हिवरे, पुष्पा गावंडे,म्हस्के,यांच्यासह तालुक्यातील असंख्य शिक्षक मंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश इंगळे, शिवाजीराव देशमुख ,अंजना बोर्डे, मंदा दळवी ,कडूबा दांडगे ,दीपक ब्राह्मणे ,शंकर जंजाळ, अनिल कळसाईद यांनी अथक परिश्रम घेतले .या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालनश्री .के डी वाघ यांनी केले .विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींचे पालक वर्गातून विशेष अभिनंदन होत आहे.















