मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही!

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची ग्वाही

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
14 February 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश आज प्रचंड, आत्मविश्वासानिशी वाटचाल करत असून यामध्ये भारत आपल्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी शनिवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. गोयल बोलत होते. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम, प्रदेश सरचिटणीस श्वेता परुळकर, राजेश शिरवाडकर, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या पुढाकाराने जगातील 38 राष्ट्रांसोबत भारताच्या मुक्त व्यापार करारांची वाटचाल सुरू झाली असून जगातील व्यापारक्षेत्राचा 70 टक्के भाग भारतासाठी खुला झाला आहे. भारतासाठी सर्वतोपरी लाभदायक ठरणाऱ्या या करारातून देशाचे संपूर्ण हित जपले जाईल, व शेतकरी वा अन्य कोणात्याही क्षेत्राच्या हितास बाधा येणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारत संकल्पाच्या पूर्ततेमध्ये आता कोणतीही शक्ती बाधा आणू शकणार नाही, असा इशाराही गोयल यांनी दिला.
देशहिताचे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश विकासाच्या गतीने पुढे वाटचाल करत असून स्वातंत्र्याच्या अमृतकाळात विकसित भारताचे स्वप्न साकार होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून पंतप्रधानांच्या संदेशातून व्यक्त होणारी कर्तव्यभावना प्रतिबिंबित होत असल्याचा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला.
जागतिक व्यापारक्षेत्रातील संधींचे दरवाजे भारतासाठी खुले होत असल्याने, अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतास या करारांचा अधिक लाभ होणार असून भारतातील शेतकरी, दूध, जीएम फूड यांना या करारातून वगळून शेतकऱ्यांचे हित जपले जात आहे. अन्य क्षेत्रांतील उत्पादनांस जगाच्या पाठीवरील नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची अभूतपूर्व संधी या करारांमधून मिळणार असून, यामुळे निर्यात, रोजगार आणि गुंतवणूक क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाच्या अमृतकाळात विकसित भारताची वाटचाल अधिक बलशाली करणारे महत्वाचे पाऊल या अर्थसंकल्पाद्वारे केंद्र सरकारने टाकले आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा
आर्थिक प्रगती, आत्मनिर्भरता, मूलभूत सुविधांना वेग, यांमुळे अर्थव्यवस्थेस साडेतीन पट अधिक बळ प्राप्त झाले आहे. 140 कोटी देशवासीयांच्या आशाअपेक्षा पूर्ण करणे, देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच उत्पादनक्षेत्रास गती देणे, रोजगारनिर्मिती करणाऱ्या क्षेत्रास प्रोत्साहन व रोजागाराच्या नव्या संधी देणे, पतहमी योजनेस प्रोत्साहन, विदेशी गुंतवणूकीतून रोजगार वाढविणे, विदेशी चलननिर्मिती, नवीनीकृत ऊर्जानिर्मितीस प्रोत्साहन अशा बहुपेडी उद्देशातूंन देशाच्या प्रगतीची नवी वाटचाल पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आहे. व त्याचा थेट लाभ महाराष्ट्राला व मुंबईला मिळणार आहे. तीन नवे केमिकल पार्क, टेक्स्टाईल पार्क, विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे प्रकल्प, ‘सबका साथ सबका विकास ‘ या ध्येयानुसार देशातील प्रत्येक नागरिकाचा विकास या कर्तव्यभावनेतून अर्थसंकल्पाची मांडणी केली आहे. महाराष्ट्रात या नीतीचा मोठा फायदा होणार आहे.
रेल्वे प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात येत असून महाराष्ट्राकरिता 24 हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेस प्रोत्साहन देणाऱ्या योजना, पुणे, नागपूरमध्ये ग्रोथ हबच्या रूपाने येत्या पाच वर्षांत विकास साधला जाणार असून त्यासाठी प्रत्येक शहराकरिता पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई-पुणे व पुणे हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरची योजना आखली जात आहे. अर्थसंकल्पाच्या प्रत्येक पैलूमध्ये महाराष्ट्राचा लाभ आणि महाराष्ट्राचे योगदान प्रतिबिंबित होत आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे होईल, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे होईल, वाढवण बंदर विकसित होईल, तिसरे विमानतळ कार्यान्वित होईल, पर्यटनास प्रोत्साहन दिले जाईल, तेव्हा स्वाभाविकच महाराष्ट्राला त्याचा लाभ होणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्राकरिता या अर्थसंकल्पातून व मोदी सरकारच्या सर्व योजनांतून मोठा फायदा होणार असून पंतप्रधानांच्या रिफॉर्म एक्स्प्रेसद्वारे देशात एक परिवर्तनाची लाट येत आहे. फ्री-ट्रेड ॲग्रीमेंट 38 विकसित देशांसोबत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे, असे सांगून गोयल यांनी महाराष्ट्र व मुंबईच्या विकासाचा मोदी सरकारच्या संकल्पाचा तपशीलवार आराखडाही या पत्रकार परिषदेत सादर केला.
काँग्रेसमध्ये नैराश्य दाटले आहे. जनतेमध्ये संभ्रम पसरविण्याखेरीज त्यांच्याकडे कोणतीही ठोस योजना नाही, कोणतेही प्रस्ताव नाहीत, आणि अपप्रचार फैलावून केंद्र सरकारवर टीका करण्याखेरीज कोणताही मुद्दादेखील काँग्रेसकडे नाही. त्यामुळेच एकामागून एक खोटे पसरवून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरविण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. मात्र, राहुल गांधी यांच्यासारखा नेता व त्यांच्या आघाडीस ज्या प्रकारे जनतेने नाकारले आहे, ते पाहता त्यांचे हे नैराश्यग्रस्त प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला.

Previous Post

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार

Next Post

एमजीएममध्ये बायोकेमिकल टेक्निक्स विषयावर कार्यशाळा संपन्न

Related Posts

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान
ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

14 February 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान
ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

14 February 2026
टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार
ताज्या बातम्या

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

14 February 2026
Next Post
एमजीएममध्ये बायोकेमिकल टेक्निक्स विषयावर कार्यशाळा संपन्न

एमजीएममध्ये बायोकेमिकल टेक्निक्स विषयावर कार्यशाळा संपन्न

क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*

क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

14 February 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

14 February 2026
टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

14 February 2026
क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*

क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*

14 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

14 February 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

14 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134