सिल्लोड (प्रतिनिधी) राज्याचे माजी मंत्री आणि सिल्लोड चे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा नफिसा बेगम (वय ६०) यांचे दुःखद निधन झाले. काल मंगळवारी ( दि.17 ) रोजी त्यांच्यावर सिल्लोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधी साठी राजकिय, सामाजिक क्षेत्रांतील विविध मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर आज ( दि.18 ) रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार संदीपान भुमरे, लोकमतचे एडिटर इन चीफ तथा माजी मंत्री राजेंद्र दर्डा, आमदार प्रा.रमेश बोरणारे, जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण, माजी आमदार सुभाष झांबड, सांडू पा. लोखंडे, नामदेव पवार,श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थानचे पिठाधिश महंत ओंकारगिरी महाराज, छत्रपती संभाजी नगरचे उप महापौर राजेंद्र जंजाळ, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश पवार, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे आदि
















