खुलताबाद प्रतिनिधी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपतींच्या पराक्रमाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी देवगिरी किल्ल्यावर ‘बाल शिवबा व जिजाऊ’ या ऐतिहासिक संकल्पनेवर आधारित फोटोसेशन दोन दिवसांपासून सुरु आहे.
या उपक्रमात लहान मुलांना बाल शिवबा तर महिलांना जिजाऊ यांच्या वेशभूषेत सजवून ऐतिहासिक वातावरणात छायाचित्रण केले जात आहे.
या फोटोसेशनद्वारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांच्या बालपणातील संस्कार, शौर्य आणि राष्ट्राभिमानाची जाणीव मुलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच मातृशक्तीचे प्रतीक असलेल्या यांच्या संस्कारांची महतीही या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.
गडकिल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पोशाख, तलवार, भगवा ध्वज आणि ऐतिहासिक सजावटीमुळे परिसरात शिवकालीन वातावरण निर्माण झाले असून छत्रपती संभाजीनगर , खुलताबाद, दौलताबाद येथील अनेक कुटुंब आपल्या मुलांसह शिवजयंती साजरी करण्याचा अनोखा मार्ग निवडला आहे.
लहाण मुलांना शिवचरित्राची ओळख आणि इतिहासाविषयी अभिमान निर्माण करण्यासाठी असे सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाचे असल्याचे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.शितल गवळी यांनी सांगितले.
















